माढा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यात भाजपाला यश – जे. पी. नड्डा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्क्याने जनता निवडून देईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी नड्डा बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील कामावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्ष महायुतीतील घटक पक्ष, कार्यकर्ते व जनता समाधानी आहे. पक्ष संघटनेच्या कामकाजासह माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता; परंतु आता मतदारसंघांमध्ये कोणतीही पाण्याची योजना शिल्लक ठेवली नाही. पाणी, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, एमआयडीसी ही कामे मार्गे लावण्यामध्ये यशस्वी झालो आहे. तसेच संघटनेतील सर्व पदाधिकार्‍यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याही प्रश्नाची सोडवणूक करण्यामध्ये कमी पडलो नाही. यापुढेही पक्ष संघटना व जनतेसाठी सातत्याने संपर्क ठेवून मतदारसंघाचा विकास घडवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन यावेळी खासदार रणजितसिंह यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!