जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपची मजबूत पकड

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात, कराडमध्ये राजेंद्र यादव शिंदे गटाची बाजी,वाई मध्ये भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का पाचगणी, महाबळेश्वर मध्ये राष्ट्रवादीने प्रतिष्ठा राखली


स्थैर्य, सातारा दि. 21 डिसेंबर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तसेच भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राजकीय पटलावर साबित करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी यशस्वी ठरले आहे .सातारा जिल्ह्याची निवडणूक प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आणि कराड उत्तरचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या यशस्वी रणनीतीने दहा पैकी सात नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश मिळाले .

कराड पालिकेमध्ये जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी मजबूत मोर्चे बांधणी करूनही माजी आमदार बाळासाहेब पाटील व राजेंद्र यादव यांच्या युतीने कराड नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवल्याने भाजपला येथे बॅकफूटवर राहावे लागले .सातारा पालिकेत 50 नगरसेवकांच्या लढतीत मनोमिलनाला तब्बल दहा अपक्ष उमेदवारांनी फटका दिला .सातार्‍यात भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखल तसेच मूळचे भाजपचे चार निष्ठावंत येथे निवडून आले आहेत .भारतीय जनता पार्टीच्या दिग्गजांना येथे अपक्षाने फटका दिला .नरसिंहराजे भोसले यांचे कट्टर उमेदवार अशोक मोरे यांची आठ टर्मची परंपरा सागर पावशेंनी मोडीत काढली .फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे नेते रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोध चांगलाच गाजला येथे समशेर नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांना पराभवाचा धक्का दिला .

वाई नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजय झाले रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजय झाले आहेत.

सातारा मलकापूर नगरपालिकेत भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनावले तर सातार्‍यात अमोल मोहिते यांनी विजयी पताका फडकवली आहे मेंढा नगर पंचायतीत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली बाराखडी विजयी झाले आहेत .पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अजित दादा गटाचे पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले .महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले .
सातारा जिल्ह्यात भाजपच्या गोटामध्ये सातारा ,फलटण , म्हसवड , रहिमतपूर ,मलकापूर ,मेढा ,वाई या सात स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत तर पाचगणी व कराड शिवसेना एकनाथ शिंदे गटाने राखले असून महाबळेश्वर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली सत्ता राखली आहे .

वाई मध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारल्याने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे .किचन कॅबिनेटच्या सल्ल्यामुळे मकरंद आबांच्या अडचण झाली राष्ट्रवादी गटाचे नितीन कदम यांचा अनिल सावंत यांनी पराभव केला राष्ट्रवादीच्या बारा जागा तर भारतीय जनता पार्टीचे 11 जागा निवडून आले आहेत .त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अर्धा किल्ला सर केल्याने मकरंद पाटलांची पुन्हा कोंडी होणार आहे .सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला आहे .कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या गटाने युती करून बाजी मारली तरी सातार्‍यात शशिकांत शिंदे यांची राजकीय मोर्चा बांधणी यशस्वी ठरली नाही . म्हसवड ला पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांच्या गटाच्या पूजा विरकर या विजय ठरले आहेत .राष्ट्रवादीच्या अभय जगताप यांच्या गटाला यश मिळू शकले नाही .रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली निलेश माने यांचा 55 मतांनी विजयी झाला .सुनील माने गटाच्या अकरा तर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक निवडून आले आहेत .सुनील माने यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे .

दरम्यान या निवडणुकीमध्ये सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांना मात्र पराभव पत्करावा लागला तर माजी नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सुजाता राजेमहाडिक या निवडून आल्या. त्यांनी आपण गेली पाच टर्म केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी दिल्याचे सांगितले.

दरम्यान सातारचे माजी नगराध्यक्ष आणि उदयनराजे यांचे उजवे हात समजले जाणारे माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी आपले मौन सोडले आणि उदयनराजे यांचे कार्यकर्ते वकील दत्ता बनकर आणि माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी उदयनराजे यांची दिशाभूल करून निष्ठावंतांना डावलले आणि चुकीच्या लोकांना तिकिटे वाटली ,त्यामुळेच हे पराभव आता स्वीकारावे लागत आहेत असा घणाघाती आरोप केला.
==============================================

सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीवर कोणाचे वर्चस्व
  • सातारा – भाजप – अमोल मोहिते
  • कराड – शिवसेना शिंदे गट – राजेंद्र यादव
  • मलकापूर – भाजप – तेजस सोनावले
  • फलटण – भाजप -समशेरसिंह नाईक निंबाळकर
  • म्हसवड – भाजप – पूजा वीरकर
  • वाई – भाजप -अनिल सावंत
  • पाचगणी – राष्ट्रवादी अजित पवार गट – दिलीप बगाडे
  • महाबळेश्वर – राष्ट्रवादी अजित पवार गट – सुनील शिंदे
  • रहिमतपूर – भाजप – वैशाली माने
  • मेढा नगरपंचायत – भाजप – रूपाली वारागडे


Back to top button
Don`t copy text!