भाजपचा पलटवार:आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचं खापर आधीच्या सरकारवर फोडताना संजय राऊत ‘हे’ विसरले, सामना अग्रलेखावरुन राम कदमांनी सुनावले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


  

स्थैर्य, मुंबई, दि.५: गच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. असे म्हणत आज शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर निशाणा साधण्यात आला आहे. आता यावरुन राम कदमांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरोग्यमंत्री हा शिवसेनेचाच होता याची आठवण राम कदमांनी करुन दिली आहे.

राम कदम ट्विट करत म्हणाले की, ”आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचं खापर आधीच्या सरकारवर फोडताना संजय राऊन हे विसरले की, तेव्हा आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते. यांना स्मृतिभ्रंश झालाय की जनतेचं लक्ष स्वतःचं अपयशापासून झाकण्यासाठी की सुशांत सिंह प्रकरणात मोठे नेते, ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही गोष्ट तयार केली आहे” असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सामना अग्रलेखात काय लिहिले होते?

‘मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही.’

पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे व सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे असे रोज बोंबलण्याने काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल, पण अशाने कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!