नाशिक मनपाच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपाचे धक्कातंत्र, 8 ऐवजी नव्याने 16 सदस्य नियुक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि.२४: महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य नियुक्तीत सत्तारुढ भाजपाने धक्कातंत्राचा वापर केला असून आठ ऐवजी सर्वच्या सर्व 16 सदस्य नियुक्त केले. अर्थात, आठ सदस्यांची नव्याने नियुक्ती केली आहे.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य नियुक्त करताना भाजपाचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक सदस्य जास्त नियुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मागील नियुक्तीस आक्षेप आल्याने संपूर्ण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महापौर सतीश सतीश कुलकर्णी यांनी आज सकाळी नूतन सदस्यांसह सर्व सदस्यांची घोषणा केली.

भाजपाच्या नूतन सदस्यांमध्ये मावळते सभापती गणेश गीते, माजी महापौर रंजना भानसी, माजी स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, योगेश तथा मुन्ना हिरे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, इंदूबाई नागरे, मुकेश शहाणे हे सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत तर शिवसेनेकडून ज्योती खोले, रत्नमाला राणे, केशव पोरजे यांच्यासह या पूर्वीचे सुधाकर बडगुजर आणि सत्यभामा गाडेकर असे एकूण पाच सदस्य नियुक्त करण्यात आले आहे. मनसेच्या वतीने सलीम शेख यांची नियुक्त करण्यात आले आहेत तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहुल दिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे सदस्य असतील.


Back to top button
Don`t copy text!