भाजपच्या कर्जत शहर महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर


स्थैर्य, कर्जत, दि. 03 : भारतीय जनता पक्षाच्या कर्जत शहर महिला आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची घोषणा महिला आघाडीच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी यांनी येथे केली.

भाजपच्या कर्जत शहर महिला आघाडीच्या नवीन कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अ‍ॅड. सौ. योगिनी विजय बाबर, सौ. दीप्ती वाडकर, तर उपाध्यक्षपदी सौ. प्राची उगले, मनिषा अथणीकर व सौ. शर्वरी कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी सौ. वैशाली मुसळे, सौ. वंदना मिश्रा व सौ. कोमल घुमरे तसेच सदस्यपदी सौ. करुणा पराडकर, सौ. रश्मी करंदीकर, सौ. माधवी गुंदरे, सौ. स्मिता कुलकर्णी, सौ. दीप्ती निंबोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचा विस्तार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या अनेकविध लोकोपयोगी निर्णयांचा कर्जत शहरातील नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य करतील, असा विश्वास सरस्वती चौधरी यांनी व्यक्त केला आणि सर्व नवीन सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!