प्रभाग ११ मध्ये भाजपचा घरोघरी प्रचार; नागरिकांचा विश्वास दृढ होतोय : संदीप चोरमले


स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपउमेदवारांचा घरोघरी प्रचार जोरदार सुरू आहे. या प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, प्रत्येक भेटीत नागरिकांचा सहभाग वाढत आहे. उमेदवारांविषयी सकारात्मक भावना व्यक्त होत असल्याचे चित्र प्रभागात आहे.

भाजपचे प्रभाग उमेदवार संदीप चोरमले यांनी ‘स्थैर्य’शी बोलताना सांगितले की, जनतेत विकासाची अपेक्षा मोठी असून, त्या दिशेने आम्ही मांडत असलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. घराघरांत झालेल्या संवादातून नागरिकांचा विश्वास दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चोरमले म्हणाले की, रणजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रभागात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. रणजितदादांच्या कार्यशैलीवर आणि संघटनेवर जनतेचा मोठा विश्वास असून, यावेळी मतदार आपला विश्वास उमेदवारीवर मोहोर उमटवून व्यक्त करतील, असा त्यांना ठाम विश्वास आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांसमोर प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येत आहे. यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढत असून, आगामी निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!