स्थैर्य, सातारा, दि. २८: पुजा चव्हाण च्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार असणार्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा व पुजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सातार्यात भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ . सुवर्णाताई पाटील यांनी महामार्गावरील बाँबे रेस्टॉरेंट चौकात रास्ता रोको करण्यात आला.
याप्रसंगी सौ. पाटील म्हणाल्या की, पुजा चव्हाणच्या मृत्युला 19 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवालही दाखल केला नाही. पूजाच्या ऑडिओ क्लिप मधील संवादावरून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही. पोलिसांवर सत्ताधार्यांचा दबाव आहे. महिलांच्या प्रतिष्ठेबाबत सातत्याने बोलणारे पुरोगामी नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणार्या सरकारच्या काळात एका तरुणीच्या मृत्यूकडे इतक्या असंवेदनशिल पध्दतीने पाहिले जात आहे, याची खंत वाटते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, राठोड यांनी राजीनामा नाही दिला तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच पूजाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी वानवडी पोलिसांकडून काढून घेवून उच्चपदस्थ पोलिस अधिकान्यांकडून केली जावी, असेही सौ. पाटील म्हणाल्या.
यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुरभी चव्हाण, सरचिटणीस मनिषा पांडे, सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. रीना भणगे, जिल्हा उपाध्यक्षा स्मिता निकम, शहरसरचिटणीस सौ हेमांगी जोशी, सौ अश्विनी हुबळीकर, उपाध्यक्षा सौ वैष्णवी कदम, सौ. नेहा खैर, जिल्हा कार्यकरिणी सदस्य सौ. निर्मला पाटील, शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. उत्कर्ष रेपाळ, व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, आरोग्यसेवा आघाडी अध्यक्ष विवेक कदम, ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष महेंद्र कदम, औद्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल संकपाळ, उमल गिरमे, हेमा भणगे, अलका भणगे, युवा मोर्चा उपाध्यक्ष दर्शन पवार, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.