दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ । लोणंद । महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी व आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासिनतेविरूद्ध लोणंद येथे आनंदराव शेळके-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व अनुप सूर्यवंशी, अनिरुद्ध दादा गाढवे यांच्या प्रमुख उपस्थिती आज शनिवार दि. २६ जून रोजी मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली, लोणंद मधील सावित्रीमाई फुले चौकात रास्तारोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले . यावेळेस तीनचाकी रिक्षा सरकारने मराठा व ओबीसी समाजाच्या केलेल्या दुरवस्थेबद्दल आनंदराव शेळके-पाटील, अनुपजी सुर्यवंशी, राहुल घाडगे, हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी कठोर शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बापूराव धायगुडे, प्रदीप क्षीरसागर, राहुल घाडगे, अशोकराव धायगुडे, रामदास शिंदे, देविदास चव्हाण, नीलकंठ भुतकर, सौ.दीपिका घोडके, सौ.वनिताताई शिर्के, महादेव(बंडा) क्षीरसागर, संदीप शेळके, भूषण खरात,महादेव , गिरीश बनकर, बापूराव क्षीरसागर आदी मान्यवर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले. तसेच चक्काजाम आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणंद पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.