स्थैर्य, सातारा, दि.१३: महाराष्ट्रातील सत्ताधारी महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास अद्यापही परवानगी न दिल्याने भाजपच्यावतीने संपूर्ण राज्यात पुन्हा मंदिर उघडा आंदोलन करण्यात आले. सातार्यातही सर्व मंदिरांसमोर कार्यकर्त्यांनी मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे धुंद सरकार अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने बार उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंदच ठेवली आहेत. याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात दि. 13 रोजी मंदिर उघडा आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरे आंदोलन करण्यात आले. सातारा शहरात सिद्धी मारुती मंदिर, राजवाडा, नवदुर्गा अंबामाता मंदिर मोळाचा ओढा, समर्थ मंदिर, कुबेर विनायक मंदिर, हनुमान मंदिर सदर बझार, तुळजाभवानी मंदिर, काळाराम मंदिर, मारुती मंदिर झेंडा चौक करंजे, शनि मारुती मंदिर, शाहूनगर दत्त मंदिर, शाहूपुरी दत्त मंदिर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
सर्व ठिकाणची आंदोलने झाल्यावर आनंदवाडी दत्त मंदिर येथे एकत्र येऊन, लाक्षणिक उपोषण करून, घंटानाद करून आंदोलनाची समाप्ती करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात दार उघड उद्धवा दार उघड, मंदिरे उघडलीच पाहिजेत, मदिरालये उघडली मंदिरे बंद का?, प्रार्थनास्थळे मोकळी झालीच पाहिजेत. मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे धुंद सरकार या प्रकारच्या घोषणा दिल्या आणि फलक घेतले होते.
भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, औद्योगिक आघाडी प्रदेश कार्यकरिणी सदस्य अमोल सणस,जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे ,नगरपालिका गटनेत्या व नगरसेविका सौ सिद्धीताई पवार,नगरसेवक धनंजय जांभळे, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष रवी पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. सुनिशा शहा, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष सौ. रीना भणगे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष उत्कर्ष रेपाळ, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, वसंतशेठ जोशी, आरोग्यसेवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक कदम, औद्योगिक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, सहसंयोजक दीपक क्षीरसागर, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रदीप मोरे, सातारा ग्रामीण उपाध्यक्ष नितीन कदम, शहर चिटणीस रवि आपटे नितीन जाधव, लखन चव्हाण, नजमा बागवान, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, अनुसूचित जाती शहराध्यक्ष संदीप वायदंडे, ज्येष्ठ नागरीक शहराध्यक्ष प्रकाश शहाणे, प्रमोद शहाणे, संस्कृतीक आघाडी शहराध्यक्ष कैलास मोहिते, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष लक्ष्मण पटेल, औद्योगिक आघाडी शहराध्यक्ष रोहित साने, कामगार आघाडी शहराध्यक्ष तानाजी भणगे, भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष बजरंग चव्हाण, सातारा शहर युवा उपाध्यक्ष आकाश कारंजकर, पंकज लाहोटी, जयराज देशमुख, अतुल जाधव, गणपत चोरट, विपुल पटेल, सातारा जिल्हा मोबाईल व्यापारी अध्यक्ष अभय घोडके, सुप्रसिद्ध व्यापारी जवानशेठ जैन, दवे काका, अविनाश पवार, किशोर गालफाडे, विद्या नारकर, पल्लवी बारटक्के, माधुरी गुरव, विक्रम अवघडे, मंथन मोहिते, रोहित माने, वरूणराज कदम, योगेश पाटसुपे, मंगेश गोगावले, संतोष पोद्दार, अनंत पवार, तेजस कदम, तुषार काशीद, प्रसाद कुलकर्णी, अभिमन्यू तांबे, संजीव आरेकर, रोहन आंबेकर, लोखंडे मामा, आदिल शेख, करण शिंदे, बसवराज चव्हाण, रवी कामठी, शेखर जडगे, राजेंद्र भणगे, संदीप पारणे, दादा चव्हाण, मंदिरांचे पूजारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.