नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची सातार्यात जोरदार निदर्शने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१० मार्च २०२२ । सातारा । राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राज्य शासनाने तत्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या आंदोलकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली सुमारे शंभर ते दीडशे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले यावेळी मोठा पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी घटनास्थळी तैनात होता.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सूर्भी चव्हाण भोसले, शहराध्यक्ष विकास गोसावी सरचिटणीस, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, इत्यादी सदस्य या आंदोलनाला उपस्थित होते आंदोलकांनी सुरुवातीला बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा आयोजित केला होता मात्र या मोर्चाला सातारा पोलिसांनी आक्षेप नोंदवल्याने मोर्चा रद्द करून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली.

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची यावेळी मागणी करण्यात आली मलिक यांना प्रवर्तन संचालनालय यांनी अटक केली असून 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे जर मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो तर दुसऱ्याचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारणी निर्णय आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित केला .जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात अल्पसंख्यांकांना दुखवायचे राष्ट्रवादीकडून हा राजीनामा घेतला जात नाही मात्र 1993च्या बॉम्बस्फोटात ज्यांचे बळी गेले त्यांच्याविषयी भाजपच्या अतिशय संवेदनशील भावना आहेत .बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगारांशी कोणत्याही प्रतिनिधींचे असणारे संबंध आम्ही खपवून घेणार नाही त्यांना राजीनामा देण्याचा पाडू अशी थेट भूमिका जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मांडली सुमारे दीडशे आंदोलकांनी नवाब हटावो देश बचाओ यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्तात जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन सादर करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!