भाजपा फलटणची दिनदर्शिका म्हणजे खासदार रणजितसिंह यांच्या कार्याचा आरसा : ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । भारतीय जनता पार्टी फलटण यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली दिनदर्शिका म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आरसा आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह यांचे कार्य घरोघरी पोहचवावे, असे निर्देश सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले

भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन फलटण येथील भाजपा संपर्क कार्यालयात संपन्न झाले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर बोलत होत्या. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन व युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, सुशांत निंबाळकर, फलटण तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत, शहराध्यक्ष सौ. कदम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

दिनदर्शिका हे जाहिरातीचे उत्तम साधन असून प्रत्येक घरांमध्ये व दैनंदिन जीवनामध्ये दिनदर्शिकेचे स्थान अत्यंत आवश्यक वस्तूमध्ये समाविष्ट झाले आहे. दिनदर्शिकेच्या अंतरंगात भाजपा देशभर राबवित असलेल्या जनहिताच्या योजनांचा आढावा घेतला. याशिवाय माढा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भव्य स्वरूपात केलेल्या विकास कामांचा ही त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही उपक्रमांच्या फोटोचा व माहितीचा अंतर्भाव या दिनदर्शिकेत अतिशय उत्तम रित्या प्रकाशित केलेला आहे, असेही सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

भाजपाचे फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिनदर्शिकेची गरज व त्यासाठी केलेल्या परीश्रमाबद्दलची माहिती दिली. भाजपाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करीत असलेल्या धडाकेबाज विकास कामांचा आढावा घेतला व खासदार यांचे हात बळकट करण्यासाठी, पक्षवाढीसाठी सर्वांनीच खूप कष्ट करून मेहनतीची गरज प्रतिपादित केली. याप्रसंगी प्रा. चंद्रकांत काळे यांनी अल्पावधीत खासदारांनी खूप मोठ्या विस्तृत विकास कामाचा डोंगर उभा केला असून दिनदर्शिकेची जाहिरात म्हणजे घागर मे सागर भरण्याचा प्रयत्न केल्याचे विशद केले.

दिनदर्शिकेच्या सुबक छपाई बद्दल राहुल शहा व सौ. मुक्ती शहा यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमास डॉ. प्रवीण आगवणे, सुनील जाधव, राजेंद्र नागटिळे, संतोष सावंत, नितीन वाघ, रियाज इनामदार, किरण राऊत, सौ. ज्योती इंगवले, सौ सावंत व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!