दैनिक स्थैर्य | दि. ९ डिसेंबर २०२३ | सातारा |
भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागळात जाऊन संघटनेचे काम करावे व सामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा. बाळासाहेब कदम चांगले काम करणारे कार्यकर्ते आहेत. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, असे प्रतिपादन फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
सातारा येथे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम सातारा रेस्ट हाउस येथे संपन्न झाला. त्यावेळी नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण तालुक्यातून जिल्हा चिटणीसपदी बाळासाहेब कदम व सहकार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले की, जिल्ह्यातील घराघरात मी भाजप वाढविण्याचे काम करीत आहे. नवीन पदाधिकार्यांनी प्रवास करावा, जनतेशी संवाद साधवा. यावेळी फलटण पश्चिमचे अध्यक्ष अमोल सस्ते, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, बाळासाहेब कदम, विजय चव्हाण, राजू धुमाळ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.