स्थैर्य, कऱ्हाड, दि.७: भाजप पक्षाकडून मलाही ऑफर होती. मात्र, कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेशी आम्ही बांधिल होता. कॉंग्रेसची विचारधारा सोडून इतर पक्षात जाणं आमच्या बुध्दीला न पटणारं होतं आणि जातीवादी पक्षाशी हात मिळवणी करणं, हे आमच्या विचारात बदत नव्हतं. आज भाजप सरकार देशात व्देष माजवत आहे. शेतकरी वर्गाची गळचेपी करत आहे. या सरकारला वेळाच धडा शिकवणे गरजेचे असल्याचा टोला विलासराव उंडाळकरांनी लागावला. कऱ्हाडातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उंडाळकर काका पुढे म्हणाले, मला जनतेनं पुष्कळ दिलं आहे, कशाचीच कमी नाही. यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला बेरजेच्या राजकारणाचा संदेश दिला आहे. तोच संदेश आम्ही यशस्वीरित्या पुढे चालवू. माझ्या ५० वर्षातील आयुष्यातील पहिली मीटिंग मी हाॅलमध्ये घेत आहे. तरी देखील इतकी गर्दी, ही आमच्या कामची पोहोच आहे. मला आठवतंय, २००३ साली इंदिरा गांधी कऱ्हाडात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी स्टेडियमवर सभा बोलवली होती. त्या सभेला दीड ते दोन लाख उपस्थित होते. तेव्हा आम्ही २००४ ची निवडणूक जिंकून दाखवली होती. सध्या देश आर्थिक, सामाजिक व्देषात गुरफटला आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आमच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रबोधन हा शब्द देखील मागिती नाही, तो त्यांच्यात रुजवला पाहिजे. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदी केली आणि कोट्यवधींचा निधी सरकारने हडपला, असा घणाघातही काकांनी केला.
केंद्र सरकारने शेतक-यांसाठी बनविलेले कायदे शेतकरी वर्गाला उद्वस्त करणारे आहेत. म्हणून या देशाला कॉंग्रेस विचारधारेशिवाय पर्याय नाही, त्यामुळे जुलमी सरकारला वेळीच अडविले पाहिजे. १९२३ साली दांडी मार्चमध्ये गांधींनी लठ्या काट्या खाल्या व आपला देश गुलामगिरीतून वाचवला, आता तशीच वेळ आली आहे. गुलामगिरीतून वाचण्याची. या भाजप सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालवली आहे. कोणतही मटण आणलं तरी गायीच मटण आहे म्हणून सामान्यांनी ठोकून काढलं जातं आहे, ही कसली मर्दुनकी. सध्या डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. यशवंतरावांनी शिक्षण, माथाडी कायदा समृध्द केला. पतंगरावांनी शिक्षण मोफत केले. मात्र, लोक याला विसरताना दिसत आहेत. कॉंग्रेस विचारधारा, मूल्य, संस्कृती जपली पाहिजे. १९०६ साली छोडो भारतच्या माध्यमातून भारताबरोबर विश्वाची काळजी घेतली गेली. गरीबांच्या कल्यासाठी कॉंग्रेसचे हात बळकट करणे गरजेचे आहे. बहुजन समाज म्हणजे मराठा नव्हे, तर तेली, माळी, मराठा आधी सर्व आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कराड तालुका थोरांची क्रमभूमी आहे, ती जपायला हवी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
मेळाव्यास महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहप्रभारी सोनल पटेल, मंत्री विश्वजित कदम, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अध्यक्ष मनोहर शिंदे, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत मोहिते, मोहन जोशी यासह जिल्ह्यातील व कराड तालुक्यातील कॉंग्रेसजण उपस्थित आहेत.