स्थैर्य, फलटण दि. 25 : भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांचे शरद पवार यांच्याविषयीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. लायकीशुन्य व पवारांच्या जोड्यांचीही पात्रता नसलेल्या पडळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण पवारांचा सल्ला घेतो हे वक्तव्य केल्याचे भान ठेवावे. शरद पवार यांचा अपमान जनता सहन करणार नसून पडळकर यांनी पवार साहेबांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी केली आहे.
गोपिचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. दिड दोन वर्षापुर्वी त्यांनी भाजपच्या विरोधात केलेली भाषणे जनता विसरली नाही. स्वत:च्या समाजाची बांधीलकी दाखवायची आणि खुर्ची मिळवायची असा त्यांचा खोटा धंदा चालू आहे. त्यांनी नुकतीच देशाचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली. पवार साहेबांचं नाव कतृत्ववान नेते म्हणुन देशभरात घेतले जाते. भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी साहेब यांनीही पवार साहेबांचे कतृत्व अनेक वेळा मान्य केले आहे. अनेक संकटावर मात करणारे नेतृत्व आपत्ती निवारण करण्याचे देशाची जबाबदारी हि पवार साहेबांवर सोपावली होती. काँग्रेसचे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दहा वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे कामामध्ये अडचन आली तर पवार साहेबांचे मार्गदर्शन व सल्ला घेत होतो असे सांगितले आहे. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये देशाच्या काही अडचणीतुन मार्ग काढण्यासाठी मी पवार साहेबांचा सल्ला घेतो असे जाहिरपणे सांगितले होते. देशभरातील सर्व बलाढ्य नेत्यांनी पवार साहेबांचे नेहमीच कौतुक केले आहे. असे असताना आपली लायकी शुन्य असताना व पवार साहेबांच्या जोड्याची सुद्धा लायकी नसणार्या पडळकरांनी आपली जीभ आवरावी, अन्यथा साहेबांवर प्रेम करणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते असा प्रकार सहन करणार नाहीत. पवार कुटुंबात कतृत्ववान माणसे आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांसारखे कतृत्ववान नेते आहेत म्हणुन आपण त्यांना शपथविधीसाठी बोलविले होते. सत्तेसाठी पवार कुटुंब चालते परंतु सत्ता नाही मिळाली तर टिका करायची हा धंदा पडळकरांनी बंद करावा. पवार साहेबांवर आमच्यासारखे पन्नास वर्षे सत्तेशिवाय प्रेम करणारे कोट्यावधी कार्यकर्ते आहेत. खुर्चीसाठी पक्ष बदला बदली करणारी आमची औलाद नाही. त्यामुळे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पवार साहेबांचा केलेला अपमान राज्यातील जनता सहन करणार नसून या वक्तव्य प्रकरणी पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.