भाजप नेते सुशांत निंबाळकर यांनी गणेश मंडळांना दिल्या सदिच्छा भेटी

फलटण व मलठण येथील मानाच्या गणपतींचे घेतले सहकुटुंब दर्शन; मंडळांकडून स्वागत


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांनी गणेशोत्सवानिमित्त फलटण शहर आणि मलठण येथील मानाच्या गणेश मंडळांना सहकुटुंब भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी विविध मंडळांच्या वतीने निंबाळकर कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सुशांत निंबाळकर यांच्यासोबत जिल्हा परिषद समन्वयक व दिशा समिती सदस्या सौ. अस्मिताताई सुशांत निंबाळकर, राजवीर निंबाळकर, शांभवी निंबाळकर आणि निंबाळकर परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. निंबाळकर यांनी विविध मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले आणि प्रसादाचा लाभ घेतला.

या भेटीदरम्यान गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळांच्या वतीने सुशांत निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मंडळांनी केलेल्या आकर्षक आणि सुबक सजावटीचे व डेकोरेशनचे सुशांत निंबाळकर यांनी यावेळी कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!