काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत भाजपा आग्रही, थिएटर मालकाला अल्टीमेटम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । सातारा । काश्मीर फाईल्स हा चित्रपट लवकरात लवकर प्रसारित व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजलक्ष्मी थिएटरचे मालक सचिन खुटाळे यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली.

काश्मीर फाइल्स हा काश्मीर मधील हिंदूंच्यावर झालेल्या अत्याचारावर आधारित सत्य परिस्थिती सांगणारा आणि ज्वलंत ऐतिहासिक चित्रपट आहे. हा इतिहास आजपर्यंत लपवला गेला आहे, या इतिहासाची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून हा चित्रपट सर्वांनी पाहणे आवश्यक आहे, यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे.
काही समाजविघातक शक्ती आणि संघटना हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत, या चित्रपटाला थिएटर उपलब्ध होऊ नये यासाठी दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु भारतीय जनता पार्टी हे प्रयत्न हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही.
त्याच प्रमाणे लवकरात लवकर हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करावा, यासाठी थिएटर व्यवस्थापनास तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, या कालावधीमध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट प्राईम टाइम मध्ये रोज किमान दोन शो मध्ये प्रसारित झाला नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चित्रपटगृह बंद करतील अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, जयदीप ठुसे, जिल्हा चिटणीस विजय गाढवे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, सरचिटणीस मनीषशेठ महाडवाले, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, अमोल टंगसाळे, चिटणीस रविंद्र आपटे, युवामोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, पंकज कुलकर्णी, जयंत देशपांडे, अविनाश खर्शीकर, स्वप्निल पाटिल, जयराज देशमुख, सागर शेळके, अजय काटवटे, अक्षय शेडगे व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदना नंतर राजलक्ष्मी थिएटरचे मालक सचिन खुटाळे यांनी रविवार] दि. १३ पासून दुपारी २.३० चा शो लावण्याचे मान्य केले तसेच लवकरच पूर्णवेळ चित्रपट लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!