पश्चिम बंगालमध्ये भाजपला दणका : भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोलकाता, दि. १२ : पश्चिम बंगालमध्ये एकीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात असतानाच आता भाजपला मोठा दणका बसला आहे. एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वीच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राजकारणापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, देश संकटात असल्याने पुन्हा राजकारणात परतलो अशी प्रतिक्रिया यशवंत सिन्हा यांनी दिली.

पुन्हा राजकारणात आल्यानंतर यशवंत सिन्हा म्हणाले- “आजच्या घटनेबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत असेल. एककीडे राजकारणाच्या चिखलातून बाहेर पडलो आणि आता दुसरीकडे पुन्हा राजकारणात कसे उतरलो असा विचार करत असाल. पण, सद्यस्थिती पाहता देश संकटात आहे. आतापर्यंत आपण ज्या लोकशाहीच्या मूल्यांवर जगत होतो, त्याचेच पालन होत नाही.”

IAS अधिकारी होते सिन्हा
यशवंत सिन्हा 1960 मध्ये IAS बनले होते. IAS रँकिंगमध्ये त्यांनी भारतात 12 वा क्रमांक पटकावला होता. आरा आणि पाटणामध्ये काम केल्यानंतर त्यांना संथाल परगनामध्ये उपायुक्त पदावर तैनात करण्यात आले होते. 24 वर्षे IAS ची सेवा दिल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये राजकारणात प्रआवेश घेतला. तसेच 1990 मध्ये चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते.

1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा केंद्रात सत्ता स्थापपित केली. 13 महिन्यांतच सरकार कोसळले. 1999 मध्ये पुन्हा वाजपेयींची सत्ता आली आणि यशवंत सिन्हा यांच्याकडे अर्थमंत्री पद देण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!