भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांचा फलटणमध्ये भीषण अपघात


दैनिक स्थैर्य | दि. 24 डिसेंबर 2022 | फलटण | भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज फलटणमध्ये सकाळी भीषण अपघात झालेला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यावर प्राथमिक उपचार फलटण मध्ये करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अजूनही दोघे तिघे प्रवास करीत होते. फलटण शहराच्या हद्दीत असणाऱ्या बाणगंगा नदी पुलावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पन्नास फूट खाली जाऊन आदळली. यामध्ये आमदार जयकुमार गोरे हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आहे.


Back to top button
Don`t copy text!