भाजपा जिल्हा महिला मोर्चाने दिले आशाताईडना लढण्याचे बळ – देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, भुईंज, दि.२८ : कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोबिड विरूद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी भाजपाचा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सो. सुरभि भोसले -चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री ब बिरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ब विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आशाताईना गुडुची टॅबलेट, सॅनिटायझर बव ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा नियोजित सातारा दोऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सुवर्णा दगडे, वेशाली भोसले, अर्चना झोरे, रजनी ओतारी ब अनिता एरंडे या आशाताईंना किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, संचालक मधुकर शिंदे, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष सतीश भोसले, सरचिटणीस सचिन घाटगे, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाई शहराध्यक्ष राकेश फुले, भुर्डजच्या सरपंच सो. पुष्पा अर्जुन भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, यश भोसले, इशान भोसले, शेखर भोसले -पाटील, उद्योजक रणजित सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गुडुची टॅबलेटचे ओषधी गुणधर्म

गुडुची टॅबलेटमध्ये जीवानावश्यक पोषक तत्व वाढण्यास मदत होते. हि टॅबलेट विषाणु अथवा जीवाणूजन्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, श्‍वास घेण्यास त्रास, बास किंवा चव जाणे व विकृत कप आदी लक्षणांवर प्रभावी काम करते. गुडुची टॅबलेटच्या सेवानाने पचन संस्था बळकट होऊन यकृताची कार्यक्षमता वाढते. तसेच शरिरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!