कराडमध्ये भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्याचा निषेध


स्थैर्य, 16 फेब्रुवारी, सातारा : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवल्याचा आरोप करत हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला. या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असल्याचे भाजप पदाधिकार्‍यांनी सांगितले.

या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कराड शहर मंडळाच्या वतीने शिवतीर्थ येथे जाहीर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे (नाना), शहराध्यक्षा सुषमाताई लोखंडे, मलकापूर मंडळ अध्यक्ष आराराबा, नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, नूतन वाघ, कांचन कालेकर, सोपान तावरे, संजय शहा, उमेश शिंदे, अनिल लोखंडे, प्रमोद वेर्णेकर, सागर माने, ओंकार बेहरे, केतन शहा, चेतन थोरावडे, प्रितेश मेहता, जयवंत चौगुले, राहुल आवटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित विषयांवर जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज अधोरेखित करत संबंधितांनी माफी मागावी, अशी मागणी केली.


Back to top button
Don`t copy text!