नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२२ । मुंबई । भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह, श्रीमती चारू सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्ही बँड, शब्द न उच्चारता सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाइप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. मुलींच्या कवायत नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

कार्यक्रमानंतर नेव्ही हाऊस येथे नौदलाचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल राजेंद्र बहादूर सिंह यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारोहाला उपस्थित राहून राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.


Back to top button
Don`t copy text!