मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्यभर त्यानिमित्त आरोग्य, रक्तदान शिबीरे, आपला दवाखान्याचे विस्तारीकरण, दिव्यांगांना सायकल वाटप यांसारख्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले.

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यात राजकीय, सामाजिक संस्था तसेच विविध संघटना आणि कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सकाळपासूनच परिसरातील शालेय मुला-मुलींचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच ओघ सुरु झाला होता. देशात तसेच विदेशातही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती विविध समाजमाध्यमांवरही झळकली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी, आनंदाश्रम, टेंभी नाका, वर्षा शासकीय निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यात विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपणासह, स्वच्छता आणि अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!