
स्थैर्य, सातारा, दि. २०: ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमेस नायब तहसिलदार (महसूल) राजेश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार (ग्रह शाखा ) महेश ऊबारे व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.