
दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२२ । फलटण । चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेले प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. श्री रामनवमी निमित्त फलटणचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम यांचा जन्मोस्तव कार्यक्रम श्रीराम मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे दुपारी बारा वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेली आहे.