
दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण । जाधववाडी येथील बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणार्या अनेक संस्थांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
यानिमित्ताने कुरवली येथील वृध्दाश्रम, महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय, ताथवडा येथील सद्गुरु गाडगे महाराज आश्रम शाळा या संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.
बिरदेव देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक दत्ता चोरमले, सचिव सुरेश चोरमले, खजिनदार विष्णू चोरमले, विश्वस्त अविनाश चोरमले, नेताजी चोरमले, सुरेश चोरमले, विठ्ठलराव चोरमले आदी मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना मदत देण्यात येते.