स्थैर्य, मुंबई, दि.११: राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत चर्चा करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्यांना ताब्यात घेतले होते. याचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीच्या अहवालामध्ये या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असे स्पष्ट झाले.
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाले. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.