स्थैर्य, दि.५: कोरोना महामारीच्या काळात आता बर्ड फ्लूची चाहूल चिंता वाढवत आहे. आतापर्यंत हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि केरळमध्ये 84 हजार 775 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामधून हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. हरियाणा आणि गुजरातचा सँपल रिपोर्ट येणे बाकी आहे.
मध्य प्रदेश : दोन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी, संपूर्ण प्रदेशात अलर्ट
मध्य प्रदेशात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. इंदुर, मंदसौर, आगर, खरगोन, उज्जैन, देवास, नीमच आणि सीहोरमध्ये कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इंदुर आणि मंदसौरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व जिल्ह्यांना अलर्ट केले आहे.
हिमाचल : आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशच्या पौंग डॅम वेटलँडमध्ये मृतक पक्ष्यांचा आकडा 2000 च्या पार गेला आहे. हे प्रकरण 28 डिसेंबर 2020 ला समोर आले होते. बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर येथे पौंग डॅमच्या आजुबाजूला एक किलोमीटरचे क्षेत्र रेड झोन आणि नऊ किलोमीटरचे क्षेत्र सर्व्हिलान्स झोन बनले आहे.
राजस्थान : आतापर्यंत 522 पक्ष्यांचा मृत्यू
राजस्थानमध्ये आतापर्यंत 471 कावळ्यांसह 522 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सहा जिल्ह्यांमध्ये 140 कावळ्यांचा मृत्यू झाला. पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, राजस्थानमध्ये बर्ड फ्लूने झालेले मृत्यू केवळ H5 इन्फ्लूएंजा आढळला आहे. जो जास्त घातक नाही. याचा सर्वात घात स्ट्रेन H5N1 आहे.
केरळ : दोन जिल्ह्यांमध्ये 50 हजार बदकांना मारण्याचा आदेश
केरळचे अलप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे. येथे 50 हजार बदकांना मारण्याचा आदेश दिला आहे. राज्याचे वन, पशुपालन मंत्री के. राजू म्हणाले, ‘जेथे संक्रमणाची माहिती मिळेल, तेथे जवळपास 1 किलोमीटरच्या परिसरातील सर्व पक्ष्यांना मारुन टाकले जाईल. राज्यात बर्ड फ्लूने जवळपास 12 हजार बदकांचा पहिलेच मृत्यू झाला आहे.’
हरियाणा : दोन दिवसात दोन फार्णमध्ये 70 हजारांपेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू
पंचकूलाच्या बरवालाच्या रायपुररानी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांमध्ये 2 फार्ममध्येच 70 हजारांपेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. फार्ममधून घेतलेल्या मृत कोंबड्यांच्या सँपलचा तपासणी रिपोर्ट आतापर्यंत आलेला नाही. सूत्रांनी सांगितल्यानुसार, महिनाभरपूर्वीच पोल्ट्री फार्ममध्ये आजार येऊ लागला तर त्यांनी कोंबड्यांना दुसऱ्या ठिकाणी विकले होते. प्रशासन आणि पोल्ट्री फार्मच्या मालकांनी हे प्रकरण दाबले होते.