स्थैर्य, दि.२७: जगास कोरोना लसीची जेवढी उत्सुकता आहे त्याहून अधिक सायबर हॅकर्समुळे जगाच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेत केपीएमजीचे हेल्थकेअर सायबर तज्ञ डेव्हिड नाइटस यांनी सांगितले, या साथरोगाच्या काळात मे महिन्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत हेल्थकेअर व लाइफ सायन्ससंबंधीच्या संस्थांवर सायबर हल्ल्याची शक्यता ३०० टक्क्यांनी वाढली आहे. विशेषत: चिनी हॅकर्स अमेरिकेतील विविध संस्थात सुरू असलेल्या लसीच्या संशोधनाचा डाटा चोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
Q. हल्ल्याबरोबरच आणखी काय ?
डार्क नेटवर हॅकर ग्रुप लसीचा डाटा हॅक करण्यासाठी बोली लावतो आहे. याशिवाय अब्जावधी रुपयांची बोली लावली जात आहे. युरोपियन बायोटेक कंपन्यांनी संशोधनाच्या सुरक्षेसाठी लॅब व संशोधन केंद्राची कनेक्टिव्हिटी तोडली.
Q. सर्वात जास्त धोका कोणत्या संस्थेस ?
फार्मा कंपन्याबरोबरच संशोधन संस्थांवरही धोका वाढतो आहे. काही दिवसांपूर्वी नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठावर हल्ला झाला. ब्रिटन, कॅनडाच्या संशोधन केंद्रावर हल्ले झाले. त्यांना ब्रिटिश एजन्सीजनी पकडले आहे.
Q. हॅकर्स नेमके कोठे हल्ले करताहेत ?
रशिया, इराण व चीनचे हॅकर्स रिसर्च सेंटरवर सायबर हल्ले करत आहेत. अमेरिकी कंपनी मॉडर्नावर हल्ला झाला. व्हिएतनामच्या हॅकर्सनी चिनी एजन्सी व बायोटेक कंपनी गिलियड सायन्सवर हल्ला केला.
सर्वसामान्य व्यक्तीसही धोका आहे काय ?
कोरोनामुळे सर्वसामान्य माणसांचा डाटा चोरीस जाण्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गुगलच्या थ्रेट अॅनालिसिस ग्रुपच्या स्टडीजमध्ये कोरोना काळात दररोज जी-मेलद्वारे १.५ कोटी लोकांना व्हायरस पाठवला जातोय. दररोज २४ कोटी कोविड संबंधित स्पॅम मेसेज पाठवले जात आहेत.