
दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२५ | सोलापूर |
रेवेवाडी येथील मायाक्का देवीचे दर्शन घेऊन गावाकडे दुचाकीवरून परत येत असताना हन्नूर ते मानेवाडी रोडवर अचानक कुत्रा आडवा आला आणि दुचाकीवरील दोघे भाऊ (दिगंबर चांदबाबा पुजारी व दत्तात्रय चांदबाबा पुजारी) खाली पडले. त्यात दिगंबर पुजारी (वय ३८, रा. हन्नुर, ता. मंगळवेढा) या तरुणाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताची पत्नी निकिता पुजारी यांनी दीर दत्तात्रय पुजारी याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली असून पतीच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलीस हवालदार काळे तपास करीत आहेत.