दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२५ | फलटण |
वडजल (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण ते लोणंद रस्त्यावर मोटारसायकल (एमएच११सीएस०५४८) ने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडला होता. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
ओंकार सुरेश सकटे (वय २६, रा. रविवार पेठ, वाई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो फलटणहून वाईकडे जात होता व त्याने हेल्मेट घातले नव्हते.
या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.