दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ २६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.५० वाजता फलटण-सातारा रोडवरून पायी चालत जात असताना जाधववस्ती, फलटण येथे अनोळखी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील अज्ञात दुचाकीचालकाने भरधाव वेगात येवून फिर्यादी आबा रावसाहेब अहिरेकर (वय ४९, रा. फरांदवाडी) यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दुचाकीस्वाराने तेथून पलायन केले. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
या अपघाताचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार राणी फाळके करत आहेत.