
दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील निंभोरे येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक व निंभोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकुंद रणवरे यांच्या निंभोरे येथील घरी ‘बिग बॉस’ फेम सिनेअभिनेते किरण माने यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी सिनेअभिनेते किरण माने यांचा रणवरे कुटुंबीयांनी यथोचित सन्मान करत स्वागत केले. यावेळी अभिनेते किरण माने यांनी ‘बिग बॉस’मधील खेळांबाबत मनसोक्त गप्पा मारल्या.