मोठा घोटाळा : एचएसबीसी, जेपी मॉर्गन, स्टँडर्ड चार्टर्ड बँकांचे बेकायदेशीर व्यवहार; अमेरिकेच्या अहवालात धक्कादायक खुलासे


 

स्थैर्य, दि.२३: एचएसबीसी, जेपी मॉर्गन चेस आणि स्टँडर्ड चार्टर्डसारख्या जगातील मोठ्या बँकांनी मनी लाँडरिंग नियमांचे उल्लंघन करत सावध करुनही संशयित कारवायांशी संबंधित हजारो कोटी रुपयांची देवाण- घेवाण करत इकडून तिकडे पाठवले. बजफीड न्यूज व आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारांच्या संघाने (आयसीआयजे) अमेरिकी अर्थ मंत्रालयाच्या फायनान्शियल क्राइम्स एनफोर्समेंट नेटवर्कच्या (फिंकसीईएन) फुटलेल्या काही अहवालांच्या चौकशीच्या आधारे हा खुलासा केला आहे.

फुटलेला अहवाल जगभरातील बँकांच्या २१०० पेक्षा जास्त संशयित व्यवहार अहवालाचा भाग आहे, जो बँकांनी फिनकेनला सन १९९९ ते २०१७ दरम्यान सोपवला होता. सामूहिक चौकशी अहवालास फिनकेन फाइल्स नाव देण्यात आले आहे. आयसीआयजेने आपल्या तपासात खुलासा केला की, बँकांनी १४६.७६ लाख कोट रुपयांपेक्षा जास्त बेकायदेशीर रकमेची देवाण-घेवाण केली. ज्याचा संबंध गुन्हेगारी, मनी लाँडरिंग व प्रतिबंधांचे उल्लंघनाशी असू शकतो. माध्यमात हे वृत्त आल्यानंतर हाँगकाँगमध्ये एचएसबीसी व चार्टर्डच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

नेपाळी बँक, कंपन्या इराण, चीनला अवैध धन पोहोचवतात

नेपाळमध्ये काही बँक व कंपन्या बेकायदेशीरपणे विदेशी रकमेचा व्यवहार इराण व चीनसाठी करत आहेत. अमेरिकेचे प्रतिबंध असतांनाही ते सुरू आहे. आयसीआरईजे व बजफीउ न्यूजच्या रविवारच्या वृत्तात हा खुलासा करण्यात आला. वृत्तानुसार नेपाळी कंपन्या व बँक इराण व चीनवरील अमेरिकेच्या प्रतिबंधाकडे दुर्लक्ष करतात. फिनकेन फाइल्सनुसार डिसेंबर २००६ व मार्च २०१७ दरम्यान नेपाळमध्ये १० बँका, १० कंपन्या व वेगवेगळ्या व्यक्तींना सीमेपलीकडे संशयित रकमेचा व्यवहार करण्यात आला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!