कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये मोठा घोटाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी मुंबई, दि.२७:  राज्यातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक परिस्थितीची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामध्ये आता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. 

ही बाब समोर आल्यानंतर आता भाजप नेते
आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी बुधवारी
याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, भाजप
जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हेदेखील उपस्थित होते.

..अखेर पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी उदयनराजेंची भूमिका जाहीर; या पक्षाला मिळणार पाठबळ!

पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रविण
दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आत्तापर्यंत कोव्हिड
सेंटर प्रकरणी 150 ते 200 पत्रं दिली काहीच कारवाई झाली नाही. आरोग्यमंत्री
हतबल झाले आहेत त्यांना परिस्थिती सांभाळणं अवघड जात आहे. मृत लोकांचे
अहवाल दाखवतात, काही लोकं गावाला आहेत त्यांची माहिती घेऊन पररस्पर खोटे
अहवाल तयार करून पैसे लाटणे सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी
फुगवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी केवळ चौकशी न
करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!