पोलीस वसाहतींसाठी मोठी तरतुद – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । सातारा । पोलीस विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतुद करण्यात आली आहे. पोलीसांना 11 रजा असायच्या त्या आता 20 करण्यात आल्या आहेत. सातारा पोलीस दलाचे शिस्तबद्ध काम सुरु आहे. पोलीस दलाला जिल्हा वार्षिक योजनेतून वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याचा उपयोग कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावा. पोलीस विभागाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. जिल्ह्यात पोलीस दलाचे काम चांगले सुरु  आहे. पोलीस दलाच्या काही अडचणी असतील तर त्या मला थेट सांगा त्या सोडविल्या जातील अशी ग्वाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

पोलीस विभागाला मिळालेल्या नवीन वाहनांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होईल.  जिल्हा वार्षिक योजनेतून यापुढे रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक श्री. बन्सल यांनी  पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत सातारा पोलीस दलासाठी एकूण 72 संगणक, 10 वाहनांकरिता डॅशबोर्ड कॅमेरा खरेदी करण्यात आलेले आहेत, 40 नग झेरॉक्स मशीन तर  दुचाकी 40 व चारचाकी 31 अशी एकूण 71 वाहने खरेदी करण्यात आले असल्याचे सांगितले

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील व गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाला मिळालेल्या नवीन चारचाकी वाहनातून शहरामध्ये फेरफटका मारला.

या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!