अॅपलला मोठे नुकसान:आयफोन 12 लॉन्चिंगपूर्वी कंपनीचे शेअर 4% कोसळले, कंपनीचे व्हॅल्यूएशन 6 लाख कोटी रुपयांनी कमी झाले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१५: अॅपलने मंगळवारी आपला पहिला 5G आयफोन लॉन्च केला. या इवेंटच्या ठीक आधी अमेरिकन शेअर बाजारात कंपनीचे शेअर 4% कोसळले. यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन 81 बिलियन डॉलर (5.94 लाख कोटी रुपये) नी कमी झाले. परंतू, बाजार बंद होईपर्यंत शेअरने थोडी रिकव्हरी केली.

अॅपलच्या शेअरमध्ये मोठी कपात

या इव्हेंटपूर्वी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कंपनीचे मोठ्याप्रमाणात शेअर्स विकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इव्हेंटपूर्वी अॅपलचे शेअर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वात कमी 119.65 डॉलर प्रती शेअरवर आले होते. यामुळे कंपनीला एकूण 81 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. परंतू, 3:35 वाजेपर्यंत शेअर्स 121.97 डॉलर प्रती शेअरवर आले होते. अखेर अमेरिकन बाजार नॅस्डॅकमध्ये अॅपलचे शेअर 121.10 प्रती शेअरवर बंद झाले.

आयफोन 12 ची लॉन्चिंग

अॅपलने आपल्या आयफोन 12 सीरीजला लॉन्च केले आहे. कंपनीने मंगळवारी रात्री कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनोमधील अॅपल हेडक्वार्टरमध्ये झालेल्या ‘हायस्पीड’ इव्हेंटमध्ये आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स लॉन्च केले. इव्हेंटमध्ये कंपनीने स्मार्ट होम पॉड स्पीकरदेखील लॉन्च केले. कंपनीचे म्हणने आहे की, आयफोन 12 मिनी जगातील सर्वात पातळ आणि हलका 5G स्मार्टफोन आहे. अॅडवांस बुकिंग 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!