वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । सातारा । लोणंद – सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरण भरण्याच्या मार्गावर आहे .

खडाळा तालुक्यातील वीर धरणाच्या पणी साठ्यात दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे. एक दोन दिवस सतत धार पावसामुळे जवळ जवळ १ टीएमसी पाणी वीर धरणात आले असल्याची माहिती अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.

काल दिनांक ११ जून रोजी सकाळी वीर धरणात ४.३९ टीएमसी म्हणजे ४६ टक्के पाणी साठा होता. काल दिवसभर आणि आज रात्री झालेल्या पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पाणीसाठ्यात एक टीएमसी ने वाढ झाली आहे. आज मंगळवारी सकाळी वीर धरणातील एकूण पाणीसाठा ५.३६ टीएमसी झाला आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणात मोठ्या प्रमाणत पणी येणार आहे या पाण्याचा उपयोग धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतीसाठी होणार आहे. त्यामूळे कालव्याच्या पाण्यावर शेती अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे. नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यावर्षी मान्सून पावसाने निरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आषाढी पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ३३७ मीमी पावसाची नोंद झाली असून ३०.६७ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात ७१३ मीमी पावसाची नोंद झाली असून २७.६२ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १३२ मी मी पावसाची नोंद झाली असून ५७ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात ८०२ मी मी पावसाची नोंद झाली असून ४६.४२ टक्के धरण भरले आहे.


Back to top button
Don`t copy text!