राजकारणात मोठी घडामोड! ‘कट्टर विरोधक’ येणार एका व्यासपीठावर


 

स्थैर्य, कराड, दि.४: माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी (ता. 6) एका व्यासपीठावर येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी तीन वाजहा हा मेळावा होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी आज (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली.

कॉंग्रेसच्या शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, शिवराज मोरे, आप्पासाहेब माने, नगरसेवक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते. श्री. जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात हे शुक्रवारी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सातारा येथे आढावा बैठक होईल. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत कराड येथील पंकज हॉटेल येथे मेळावा होणार आहे. 

तेथे माजी मुख्यमंत्री चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, अॅड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मेळावा होईल. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!