
स्थैर्य, दि.२२: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध होत असतांनाच मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये(MSP) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली. मुख्य 6 पिकांमध्ये ही वाढ आहे. गहू, चना, हरबरा, करडई यासह 6 पिकांच्या किंमतींमध्ये 50 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे.
सर्वात जास्त मसुराच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
पीक | MSP (रु/प्रती क्विंटल) आधी | MSP (रु/प्रती क्विंटल) आता | अंंतर (रु/प्रती क्विंटल) |
गहू | 1925 | 1975 | 50 |
ज्वारी | 1525 | 1600 | 75 |
मोहरी | 4425 | 4650 | 225 |
हरभरा | 4875 | 5100 | 225 |
करडई | 5327 | 112 | |
मसुर | 4800 | 5100 | 300 |
CACP म्हणजेच कमीशन फॉर अॅग्रीकल्चर कॉस्ट अॅड प्राइसेजच्या शिफारशीनुसार सरकार प्रत्येक पीक हंगामापूर्वी एमएसपी निश्चित करते. एखादे पीक खूप आले असेल, तर त्याचा बाजारभाव कमी केला जातो. तेव्हा MSP शेतकऱ्यांसाठी फिक्स एश्योर्ड प्राइजचा कमी करते.
MSP काय आहे ?
MSP तो गॅरेंटेड भाव आहे, जो शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर मिळतो. मग बाजारात त्या पीकाची किंमत कमी असली, तरी चालेल. बाजारात होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठीच हा निर्णय घेतला जातो.
आता याची चर्चा का ?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन विधयक आणले. विरोधक या विधेयकांचा विरोध करत आहेत. विरोधकांना चितां आहे की, एमएसपीची सुविधा बंध केली जाईल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केले आहे की, MSP बंद होणार नाही.