स्थैर्य,सातारा, दि.२१: सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणारी टोळीचा सातारा एलसीबीने पर्दाफाश केला आहे. या टोळीत दोन विधसंघर्ष बालक अहेत. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या 13 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती अशी, दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १.०० ते ३.३० वा . चे दरम्यान गणेश भगवान तळेकर रा. विलासपूर गोडोली यांच्या राहते घरासमोर लावलेली त्यांच्या Avon Maxo कंपनीची गिअरची ८ हजारांची सायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली होती. याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली होती. शहरात सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधिकक्ष यांच्या सूचनेनुसार एलसीबीमध्ये सायकल चोरट्यांचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना झाली होती. या पथकाने सायकल चोरीबाबत तपास सुरू केला असतानाच दि. २० रोजी पाडळी, ता. जि. सातारा येथील एका इसमाने साथीदारांसह गोडोलीत चोरलेली सायकल व सातारा शहरातून आणखी काही सायकल चोरलेल्या असून त्या गावातील लोकांना विकलेल्या आहेत, अशी खबर एलसीबीला मिळाली.
याबाबत खात्री करुन कारवाई करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने पथकाने पाडळी ता.जि.सातारा येथे जावून संबंधित इसमास ताब्यात घेवून तपास केला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असून तो व त्याचे इतर दोन साथीदार यांनी गेल्या वर्षामध्ये सातारा शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून सायकल चोरल्या असल्याचे सांगून १,४०,५०० / – ( एक लाख्न चाळीस हजार पाचशे रुपये ) किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या एकुण १३ चोरलेल्या सायकल काढून दिल्या आहेत.
सर्व सायकल गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आल्या असून सायकल काढुन देणार विधी संघर्षग्रस्त बालक व त्याचा साथीदार आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेवून मा.बाल न्याय मंडळ सातारा यांच्यासमक्ष हजर केले असता त्यांना जामीनावर मुक्त केले आहे.
श्री.अजय कुमार बंसल , पोलीस अधीक्षक सातारा व श्री . धीरज पाटील , अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या सूचनाप्रमाणे व श्री . किशोर धुमाळ , स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे , आनंदसिंग साबळे , सहायक फौजदार तानाजी माने , पोहवा . अतिश घाडगे , संजय शिर्के , विजय कांबळे , पो.ना. शरद बेबले , साबीर मुल्ला , प्रविण फडतरे , मुनीर मुल्ला , निलेश काटकर , विशाल पवार , रोहित निकम , सचिन ससाणे , प्रमोद सावंत , गणेश कापरे , अमित सपकाळ , पो.कॉ. विशाल पवार , धीरज महाडीक , विक्रम पिसाळ , वैभव सावंत , संकेत निकम , चालक विजय सावंत यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक , सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, ज्यांच्या सायकल चोरीस गेल्या असतील त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा , सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.