दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील बिबी येथील एका सर्वसामान्य घरातील इश्वर हिंदुराव कचरे या युवकाची भारतीय सैन्य दलात म्हणजेच इंडीयन आर्मीमध्ये निवड झालेली आहे. त्याच्या निवडीबद्दल बिबीसह फलटण तालुक्यातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले.
इश्वरची घरची परिस्थिती बेताचीच त्याच्या घरी आई, वडील, आजी व दोन बहिणींसह चार चुलते असा मिळून परिवार आहे.