फलटण शहरात उद्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 12 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण नगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध भागातील एकूण 25 रस्त्यांच्या कामाचा भूमीपूजन समारंभ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते उद्या, दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संपन्न होणार आहे. सदरच्या कार्यक्रमास फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

– भूमीपूजन होणार्‍या रस्त्यांचा प्रभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे –

– प्रभाग क्रमांक 2 –

1) पेठ मंगळवार पंढरपूर रोड ते श्री.युवराज अहिवळे घर ते पटेल पिछाडी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.

2) पेठ मंगळवार सार्वजनिक शौचालय पाठीमागील बाजू ते मेहत्तर कॉलनी भिंत रस्ता करणे.

– प्रभाग क्रमांक 6 –

1) पेठ शुक्रवार चांदतारा मस्जिद पिछाडी ते नसरुद्दीन शेख घर रस्ता करणे.

2) पेठ शुक्रवार मानकेश्‍वर मंदिर ते अभिजित जानकर घर रस्ता करणे.

3) पेठ शुक्रवार वेलणकर दत्त मंदिर ते चाँदतारा मस्जिद पर्यंत रस्ता करणे.

4) पेठ शुक्रवार मस्जिद ते सावकार घरापर्यंत रस्ता करणे.

5) पेठ शुक्रवार सावकार घर ते चावडी पर्यंत रस्ता करणे.

6) पेठ शुक्रवार चावडी ते मारुती मंदिर रस्ता करणे.

– प्रभाग क्रमांक 7 –

1) मेटकरी गल्ली घाडगेवाडा ते सोनार मॅडम घर रस्ता करणे.

2) क्रांतीसिंह उमाजी नाईक चौक ते परिवार साडी सेंटर ते पेठ रविवार तालीम रस्ता, परिवार साडी सेंटर ते पोतेकर घर ते बारामती चौकाकडे जाणारा रस्ता.

– प्रभाग क्रमांक 10 –

1) सणगर गल्ली अंडीवाले बोळ ते श्रीकृष्ण मंदिर पिछाडी रस्ता करणे.

2) पेठ कसबा जयहिंद कोल्ड्रींक्स ते डॉ.जगताप दवाखाना रस्ता करणे.

3) पेठ कसबा ह.बा.कुलकर्णी घर ते रवि शिंदे गिरणी पर्यंत रस्ता करणे.

4) रंगारी महादेव परिसर कदम घर ते राजेंद्र मठपती घर रस्ता करणे.

5) रंगारी महादेव परिसर माने घर ते कानसाळे घर रस्ता करणे.

6) रंगारी महादेव परिसर बाजारे गुरुजी ते पारडेकर मठ पर्यंत रस्ता करणे.

7) रंगारी महोदव परिसर अवस्थान मंदिर ते गणदास घर रस्ता करणे.

8) श्रीकृष्ण मंदिर पिछाडी भोरी स्मशान भुमी ते डॉ.गुंगा घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.

9) पेठ बुधवार डॉक्टर राजवैद्य पिछाडी रस्ता करणे.

– प्रभाग क्रमांक 11 –

1) स्वामी विवेकानंद नगर डॉ.बिचुकले बंगला ते शिवनेरी अपार्टमेंट पर्यंत रस्ता करणे.

2) स्वामी विवेकानंद नगर गौरवबुवा शेवळीकर ते नगरपरिषद ओपनस्पेस पर्यंत रस्ता करणे.

3) कॉलेज रोड मारुती मंदिर ते महादेव मंदिर रस्ता करणे.

4) कॉलेज रोड महादेव मंदिर ते कॉलेज रस्ता करणे.

– प्रभाग क्रमांक 12 –

1) गोळीबार मैदान, उमेश निंबाळकर घर ते शाळा कंपाऊंड पर्यंत रस्ता करणे.

2) रिंगरोड ते खान घर ते अभंग हॉस्पिटल रस्ता (आदिती गार्डन जवळ) करणे.


Back to top button
Don`t copy text!