वंजारवाडीत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवार दि. 28 फेब्रुवारी रोजी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. वंजारवाडी गावठाण येथील वॉर्ड नं 3 मध्ये अंकुर प्रोजेक्ट ते सचिन चौधर यांचे घर परिसर येथे शासनाच्या व ग्रामपंचायत 1505 वर्ग निधीमधून रस्त्याचे भूमिपूजन सरपंच सौ. किरणताई जगताप, उपसरपंच विनोद चौधर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक निलेश लव्हटे, सदस्य मोहन चौधर, बबन सावंत, ग्रामस्थ संतोष चौधर, बंडू खोगरे, रणजित जगताप, प्रवीण चौधर, सचिन चौधर, राघू चौधर, मारूती खोमणे, पिंटू सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार विनोद चौधर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!