उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । सातारा । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे,  जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार आदी उपस्थित  होते.

यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी पुणे -मुंबई येथे जाऊ नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पाहिल्या व दुसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सुविधा वाढविण्यावर शासनाने भर दिला. कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांना पटले. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून बाहेरील राज्यातूनही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

कोरोना बाधित उपचारापासून  वंचित राहू नये म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून 30 टक्के निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. लस घेतल्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.  प्रत्येक नागरिकांने कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी निधीची भरीव तरतूद केली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालये सर्वसोयींनी युक्त उभे करण्यात येतील. खटाव येथील नवीन बांधण्यात येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र वैभवात भर घालणारे ठरेल. या प्राथमिक आरोग्य केंद्राला आवशयक मनुष्यबळ देण्यात येईल अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संसर्गामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांचे महत्व खूप वाढले आहे. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू चांगली उभी राहील व या वास्तुमधून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याचे काम होईल. पहिली व दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागने चांगले काम कले असून तिसऱ्या लाटेसाठीही प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी प्रत्येक नागरिकाने शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे.


Back to top button
Don`t copy text!