दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, सचिन पाटील, माणिकराव सोनवलकर, विलासराव नलवडे, धनंजय साळुंखे पाटील, संजयराव कापसे, रणजित भोसले, अजय माळवे, सुधीर अहिवळे, अमोल सस्ते, सूर्यकांत दोशी, आमिर शेख यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यास धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष संदीप चोरमले, संतोष गावडे तसेच महादेव पोकळे, बजरंग गावडे, नानासाहेब इवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विजय भिसे, विष्णू सूळ, संदीप बुधनवर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे आणि उपाध्यक्ष संदीप चोरमले यांनी पुतळा समितीस मान्यता मिळावी म्हणून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले होते. समितीचे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधवांची पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा व्हावा ही मागणी होती.
अखंड हिंदुस्थानात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठं ऐतिहासिक कार्य आहे. त्यांच्या कार्याला शोभेल असा सुंदर पुतळा आणि सुशोभीकरण करणार आहे. रुपये २० लाख निधी उपलब्ध केला आहे. अजून गरजेनुसार निधी उपलब्ध करणार, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भूमिपूजनप्रसंगी सांगितले.
यावेळी समितीच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वेताची काठी, घोंगडी आणि पिवळा जरीचा फेटा देऊन सन्मान केला. अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांची खणानारळाची ओटी भरून सन्मान सरपंच सौ. शुभांगी तुकाराम शिंदे आणि धनश्री बजरंग गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
समितीचे खजिनदार महादेव पोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.