
स्थैर्य, फलटण, दि. २४ ऑगस्ट : शेंडगेवाडा-वांजाळे-वडले (ता. फलटण) येथील श्री भिवाई धुळदेव देवस्थानचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मंगल दिनानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी ७ ते १० या वेळेत महापूजा, ११ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि दुपारी १ वाजता मंदिराच्या शिखरावर कलशारोहण करण्यात आले. यानंतर दुपारी गजनृत्य आणि देवाच्या आगमनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी वडले गावचे युवा नेतृत्व विजयकुमार सोनवलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या धार्मिक सोहळ्यासाठी माजी उपसरपंच किरण लाळगे, दत्ता शेंडगे, अमोल सोनवलकर, संपत शेंडगे, जगन्नाथ काळे, साळू शेंडगे, विठ्ठल शेंडगे, तुकाराम काळे, बबन ठोंबरे यांच्यासह शेंडगेवाडा, वांजाळे आणि वडले येथील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.