दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना संदर्भात तातडीने अंमलबजावणी आणि यासंदर्भातील निराधार पेन्शन लाभार्थ्यांना वेळेवर मिळावी या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.
भीमशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राज रतन कांबळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडीच्या सुनिता ढेकळे, बाळासाहेब शिरसाट, आशा बोभाटे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश वाघमारे, उमा काकडे, यशवंत बरकडे ,शुभांगी लादे संदीप कांबळे, सयाजी कांबळे, गजानन कांबळे इत्यादी संघटनेची पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना राजरतन कांबळे म्हणाले की अलीकडच्या काही वर्षांमध्ये निराधार योजनेमार्फत दिला जाणारा निधी वेळेवर येत नसल्याने हजारो वयोवृद्ध लाभार्थी अपंग लाभार्थी अंध व्यक्ती यांना हालअपेष्टांचे जीवन जगावे लागत आहे त्यांना औषधासाठी योजनेच्या मदतीची वाट पहावी लागत आहे पेन्शनच्या आधारावर उधार औषधे घेण्याची वेळ या निराधार लाभार्थ्यांवर येत आहे.
दरमहा निराधार पेन्शन योजनेचा निधी वेळेवर यावा पेन्शन वेळेवर केली जावी तसेच प्रतिमा 1000 रुपये लाभार्थी यांना अपुरे पडत असल्याने त्यामध्ये वाढ होऊन ही पेन्शन दोन हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केली या मागण्यांची निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.