
दैनिक स्थैर्य । दि. ०९ मार्च २०२२ । गोखळी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगारातील चालक सुखदेव भिमराव अहिवळे यांना खात्यांतर्गत बढती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. या निवडीबद्दल फलटण आगार वाहतूक शाखा व कर्मचारी यांचे वतीने सुखदेव अहिवळे यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सुखदेव भिमराव अहिवळे यांनी एस. टी. मध्ये चालक म्हणून दहिवडी, सातारा, पारगाव खंडाळा, फलटण आगारात गेली २९ वर्षे सुरक्षीत सेवा दिली आहे. एस. टी. मधील सेवेची ५ वर्षे शिल्लक असून सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत खेळीमेळीत व आनंदाने सेवा काल पूर्ण करण्याची ग्वाही देत सरकारबद्दल अहिवळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.