दैनिक स्थैर्य | दि. ०५ जानेवारी २०२५ | फलटण | पुणे जिल्ह्यातील पाडेगाव परिसरात १ जानेवारी रोजी योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जात असलेल्या लोकांकरिता योद्धा प्रतिष्ठानने लोणंद नीरा लगत असलेल्या पाडेगाव च्या परिसरात मोफत चहा व पाणी वाटपाचे आयोजन केले.
रस्त्याच्या बाजूला एक मंडप उभारण्यात आला होता, ज्यामध्ये मोफत चहा व पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकांनी या परिसरात थांबून या उपक्रमाचा लाभ घेतला. गाडीला निळा ध्वज लावून निघालेल्या अनेक गाड्या या परिसरात थांबल्या आणि त्यांनी देखील थोडी विश्रांती घेतली. या मार्गातून भीमा कोरेगावला जात असलेल्या लांबच्या अंतरावरील लोकानी या उपक्रमाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
याच दिवशी योद्धा ग्रुपचे पदाधिकारी पै.रोहन भैय्या ढावरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने देखील वृक्षरोपणाचे कार्य हाती घेण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवसेवस्ती (पाडेगाव) या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला. “झाडे लावा झाडे जगवा” हा अनोखा संदेश वाढदवसाच्या निमित्ताने देण्यात आला.
हे दोन्ही उपक्रम पार पडत असताना यावेळी योध्दा प्रतिष्ठानचे संस्थापक /अध्यक्ष बापू ढावरे, रोहन ढावरे, प्रविण ढावरे, अनिकेत रासकर, हेमंत सुतार, अभी बिचुकले, ओमकार देवकर, रूपेश ढावरे, सोमनाथ चौगुले, सनी चव्हाण, अनिकेत कांबळे, दादा ढावरे, ऋषी ढावरे, अभी रासकर, अनिकेत रासकर इत्यादिसह योध्दा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. योद्धा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असल्याने नक्कीच यासारखे अनेक उपक्रम घेण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचं.
भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचित्याने योद्धा प्रतिष्ठान द्वारे घेतलेले हे उपक्रम समाजात एकता व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.