भीमा कोरेगाव प्रकरण : आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात शुक्रवारी दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

फादन स्टेन स्वामींना अटक

भीमा-कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई केली होती. भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणा-या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणा-या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. जवळपास २० मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली होती.

फादर स्टेन स्वामी हे एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं आहे. झारखंडच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी स्वामी यांच्या अटकेला विरोध सुरू केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं. त्यामुळेच मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या मागे आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे, असं रामचंद्र गुहा यांनी म्हटल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!